Advertisement

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी...मुंबईकरांनो, दूध जपून प्या!

दुधात भेसळ होते आणि असं भेसळयुक्त दुध लहान मुलांसह सर्वांच्याच शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं, हे काही कुणी सांगायला नको. भेसळ आणि भेसळखोरांना रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीे) काम करतंय खरं, पण प्रत्यक्षात दुधभेसळ रोखण्यात १०० टक्के यश काही एफडीएला आलेलं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे आणि तेही एफडीएच्याच कारवाईतून!

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी...मुंबईकरांनो, दूध जपून प्या!
SHARES

दुधात भेसळ होते आणि असं भेसळयुक्त दुध लहान मुलांसह सर्वांच्याच शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं, हे काही कुणी सांगायला नको. भेसळ आणि भेसळखोरांना रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीे) काम करतंय खरं, पण प्रत्यक्षात दूधभेसळ रोखण्यात १०० टक्के यश काही एफडीएला आलेलं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे आणि तेही एफडीएच्याच कारवाईतून!


२ हजार ७०० लिटर दूध जप्त

एफडीएने २० आणि २१ जानेवारीला मुंबईतील पाच एन्ट्री पाईंटवर छापे टाकत कारवाई केली. त्यावेळी २ हजार ७०० लिटर दूध भेसळयुक्त आढळल्यानं ते त्वरीत परत पाठवण्यात आल्याची माहिती एफडीए आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी दिली आहे. २० जानेवारीला ११ वाजता एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दहिसर चेकनाका, मानखुर्द चेक नाका, एेरोली टोल नाका, मुलुंड-एलबीएस चेकनाका आणि मुलुंड पूर्व जकात नाका अशा पाच ठिकाणी कारवाई केली. ही कारवाई रात्रभर अर्थात २१ जानेवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंत सुरू होती.




हजारो लिटर दुधामध्ये भेसळ

या कारवाईत एफडीएने १२७ वाहनांमधील ४ लाख ६२ हजार ४०० लिटर दुधाची तपासणी केली आहे. यावेळी २ हजार ७०० लिटर दूध भेसळयुक्त आढळल्यानं ते त्वरीत परत पाठवण्यात आलं आहे. या भेसळयुक्त दुधाचे ८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईत २ हजार ७०० लिटर भेसळयुक्त दूध आढळलं आहेच, पण मुंबईतून भेसळयुक्त दुधासंबंधीच्या तक्रारीही वाढत चालल्याचं एफडीएनं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे एफडीएने राज्यभर लाखो लिटर दुधाची तपासणी करत ७४२ दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.



हेही वाचा

तुमच्या घरचं दूध भेसळयुक्त की भेसळमुक्त?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा