Advertisement

तुमच्या घरचं दूध भेसळयुक्त की भेसळमुक्त?


तुमच्या घरचं दूध भेसळयुक्त की भेसळमुक्त?
SHARES

मुंबई - सध्या भेसळयुक्त दुधाचं प्रमाण खूप वाढलंय. पण यापुढे तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही. कारण लवकरच तुम्हाला घरच्या घरी दुधातील भेसळ ओळखता येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) ग्राहकांना दुधातील भेसळ ओळखता यावी यासाठी प्रयत्न करत आहे. त्यानुसार भेसळ ओळखणारं किट (मिल्क टेस्टिंग किट) ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मुंबई लाइव्हला दिली.
या किटमुळे दुधात पाणी, डिटर्जन्ट, स्टार्च वा जी भेसळ असेल, ती दिसू लागेल. सध्या दूध उत्पादक संस्था, कंपन्यांमध्ये मिल्क टेस्टिंग किट वापरतात. तर बाजारातही ग्राहकांना दुधभेसळ ओळखता यावी यासाठी किट उपलब्ध आहेत. मात्र या किटची किंमत 3 ते 4 हजार रुपये असल्यानं ती परवडत नाही. म्हणून एफडीएने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून स्वस्तात, 400 ते 500 रुपयांत हे किट उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू केलेत. वर्षभरापूर्वीच हे परवडणारं किट बाजारात येणं अपेक्षित होतं. मात्र काही तांत्रिक आणि इतर अडचणींमुळे विलंब झाल्याचंही कांबळे यांनी सांगितलं. या किटद्वारे 4 ते 5 वेळा दुधाची तपासणी करणं शक्य होईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा