मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करा- योगेश सागर

मुंबई आणि उपनगरांत लागू केलेली १० टक्के पाणीकपात आणि पाणी पुरवठ्याच्या वेळेतील कपात रद्द करावी, अशी सूचना नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे.

SHARE

जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. तसंच, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही पावसानं चांगली हजेरी लावली असूनतलावांतील उपयुक्त साठ्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेनं गेल्या वर्षी १५ नाव्हेंबरपासून मुंबई आणि उपनगरांत लागू केलेली १० टक्के पाणीकपात आणि पाणी पुरवठ्याच्या वेळेतील कपात रद्द करावी, अशी सूचना नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे.

५० टक्क्यांपर्यंत वाढ

मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळं मुंबईकराचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्यानं पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळं महापालिकेनं पाणी पुरवठ्यामध्ये १० टक्के कपात केली होती. त्याशिवाय, पाणी पुरवठ्याच्या वेळेतही १५ टक्के कपात केली होती. मात्र, आता तलावांत पुरेसा पाणीसाठा असल्यानं पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली.

पावसाचे ५७ दिवस

जून व जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळं तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणं, पावसाचे ५७ दिवस सप्टेंबरपर्यंत असल्यामुळं या काळात समाधानकारक पाऊस पडल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे.



हेही वाचा -

मुंबईतील सरकारी जमिनींचं दरवर्षी ऑडिट करा- राहुल शेवाळे

बायोमेट्रीक हजेरीविरोधात महापालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन



संबंधित विषय
ताज्या बातम्या