Advertisement

बायोमेट्रीक हजेरीविरोधात महापालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

पालिकेचा निषेध करण्यासाठी ग्रॅण्ट रोड येथील 'डी' विभागात शुक्रवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केलं जात आहे. त्याशिवाय, येत्या २० जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही, तर २१ जुलैपासून सर्व २४ वॉर्डमध्ये 'काम बंद' आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

बायोमेट्रीक हजेरीविरोधात महापालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन
SHARES

महापालिका कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रीक हजेरीतील तांत्रिक बिघाडांमुळं पगाराचा गोंधळ अद्याप सुरूचं आहे. बायोमेट्रिक हजेरीतील तांत्रिक दोषांमुळं महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार कापला गेला आहे. जुलै महिना संपत आला तरी देखील हजारो कर्मचाऱ्यांना कापलेला पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं पालिकेचा निषेध करण्यासाठी ग्रॅण्ट रोड येथील 'डी' विभागात शुक्रवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केलं जात आहे. त्याशिवाय, येत्या २० जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही, तर २१ जुलैपासून सर्व २४ वॉर्डमध्ये 'काम बंद' आंदोलनाचा इशारा समन्वय समितीनं दिला आहे.

शून्य पगाराची स्लिप

बायोमेट्रीक हजेरी पगाराला लिंक केल्यामुळं तसंच बायोमेट्रीक हजेरीतील बिघाडामुळं कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कापले गेले असून, अनेकांची गैरहजेरी नोंदवण्यात आली आहे. या गोंधळामुळं ४० हजारांवर कर्मचाऱ्यांचा पगार कापला गेला. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहूनही शून्य पगाराची स्लिप मिळाली. तर अनेकांना एक हजार, हजार, हजार पगार मिळाला. तसंच, काहींना ८१ रुपयांपर्यंत मासिक वेतन हाती आलं आहे.

पालिका अधिकाऱ्यांची भेट

याप्रकरणी 'डी' विभागाच्या कामगारांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, भेटीनंतर देखील कापलेला पगार मिळालेला नाही. त्यामुळं याचा निषेध करण्यासाठी सफाई, ड्रेनेज, रस्ते, दुरुस्ती, विद्युत, पर्जन्यजलाहिन्या, पाणी, उद्यान, कीटकनाशक या सर्व खात्यांतील कामगार 'म्युनिसिपल मजदूर युनियन'च्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन करणार आहेत. त्याशिवाय, आयुक्तांकडून पगार देण्याबाबत ठोस आश्वासन आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही कामगार संघटनेनं दिला आहे.

पगाराला लिंक

पालिका कर्मचाऱ्यांची हजेरी काटेकोरपणे नोंद करण्यासाठी महापालिका प्रशासनानं मागील काही महिन्यांपासून बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरू केली असून ती पगाराला लिंक केली. मात्र, अनेकदा बायोमेट्रिक यंत्रणेमध्ये वेळेवर हजेरी नोंदवूनही गैरहजर म्हणून नोंद होत असल्याचं कर्मचाऱ्यांच म्हणणं आहे.



हेही वाचा -

जागा वाटपावरून युतीत पुन्हा कलगीतुरा?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा