Advertisement

मोठी दुर्घटना टळली


मोठी दुर्घटना टळली
SHARES

चिंचपोकळी - नाम जोशी मार्गावरील रतन सदन इमारती जवळ जमिनीखालची महानगर गॅस कंपनीची पाईपलाईन लिकेज झाली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस पसरली होती. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. रतन सदन इमारतीतले रहिवाशी विजय गायकवाड यांनी महानगर गॅस कंपनी आणि अग्निशमन दलाला दूरध्वनी करून याची माहिती दिली. महानगर गॅस कंपनीचे इंजिनियर, अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नाम जोशी मार्गावरील वाहतूक बंद केली. तीन तासाच्या मेहनतीनंतर अखेर गॅस लिकेज आटोक्यात आणण्यात यश आलं आणि मोठी दुर्घटना टळली. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा