Advertisement

'या' रुग्णालयातील बेपत्ता मृतदेह सापडला शवागृहातच

बेपत्ता मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहातच पडून असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.

'या' रुग्णालयातील बेपत्ता मृतदेह सापडला शवागृहातच
SHARES

मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातून मृतदेह बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. मृतदेह बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियाच्या तक्रारीवरून राजावाडी रुग्णालयाचे शवकक्ष अधिकारी, आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यावेळी याप्रकरणी अधिक तपासणी केली असता बेपत्ता मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहातच पडून असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.

बेपत्ता मृतदेह असलेल्या संबंधिताच्या गुडघ्यावर २०१७ मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेच्या खुणांवरून त्याची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी नातेवाईकांसोबत झालेल्या चाकू हल्ल्यात गोवंडीचा तरुण जखमी झाला. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडं रुग्णाची कोरोना चाचणी करणं गरजेचं असल्यानं रुग्णालयानं मृतदेह देण्यास नकार दिला. ८ जूनच्या रात्री तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. मंगळवारी याबाबत कुटुंबियाना सांगण्यात आले. पण त्याच्या मृतदेह शवागृहात आढळला नव्हता. त्यावेळी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुशील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. त्यांनी शवागृहातूनच शोध सुरु केला. शवागृहातील १७ आणि कुटुंबियाच्या ताब्यात दिलेल्या मृतदेहांबाबत तपास केला. यात, एका मृतदेहाबाबत संशय आला. मृतदेह कुजल्याने ओळख पटविण्यास अडचण निर्माण होत होती.

मृतदेहाच्या एक्सरेमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे शुक्रवारी समोर आलं. त्यानुसार चौकशी करताच २०१७ मध्ये संबंधित तरुणाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचं कुटुंबियांकड़ून स्पष्ट झाले. मात्र कुटुंबियांना ते मान्य नव्हतं. अखेर, डीएनए अहवाल काढण्यात आला. त्यानंतर हा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं अखेर त्यांचा विश्वास बसला.



हेही वाचा -

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह

गुड न्युज: मुंबई लोकल ट्रेन अखेर सुरू, पण..



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा