Advertisement

सायन कोळीवाड्यात मनसेचा निषेध मोर्चा


सायन कोळीवाड्यात मनसेचा निषेध मोर्चा
SHARES

शीव - मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी 23 मार्चला सायन कोळीवाडापासून ते अँटॉप हिल पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. सायन कोळीवाड्यातील आमदार तमिल सेल्वन यांचे भाऊ मुर्गन सेल्वन यांनी आक्षेपार्ह मेसेज व्हॉट्सअप द्वारे पसरवला होता. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ मनसे उपाध्यक्ष विनोद खोपकर यांनी मोर्चा काढला.

मुर्गन सेल्वन यांनी केलेल्या या अपमानास्पद कृत्यास शिक्षा म्हणून त्यांना अटक करावी असे निवेदन या मोर्चाद्वारे पोलिसांना करण्यात आले. 2 दिवसांची मुदत घेऊन शनिवारी मुर्गन सेल्वन यांना अटक केली जाईल असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एन. एच. शेख यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा