मनसे उपाध्यक्ष उदय सावंत कालवश

 Mira Bhayandar
मनसे उपाध्यक्ष उदय सावंत कालवश
Mira Bhayandar, Mumbai  -  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उदय सावंत यांचे सोमवारी निधन झाले . ते 55 वर्षांचे होते. 5 दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना मीरा रोड येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी हजर होते.नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे तसेच अन्य पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. उदय सावंत हे शिवसेने पासूनच राज ठाकरे यांचे सहकारी म्हणून काम करत होते. शिवसेनेतील विद्यार्थी सेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष पद असा त्यांचा राजकीय प्रवास होता.

Loading Comments