24 मे रोजी म्हणजेच काल केरळात दाखल झालेल्या मोसमी वा-याने अवघ्या एका दिवसात कर्नाटक, गोव्याचा प्रवास पूर्ण करत थेट महाराष्ट्रात धडाकेबाज प्रवेश केलाय. त्यामुळे मान्सूनला यंदा जरा घाईच असल्याचं दिसंतय. अंदमान-निकोबारपाठोपाठ केरळ आणि आता राज्यतही मान्सून नियोजित वेळेआधी दाखल झालाय.
नैऋत्य मान्सून 24 मे 2025 रोजी केरळमध्ये दाखल झाला. सामान्यत: तो 1 जून रोजी दाखल होतो. म्हणजेच नैऋत्य मान्सून केरळमध्ये सामान्य तारखेच्या 8 दिवस आधी दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
पण अशाप्रकारे पाऊस लवकर कोसळण्याची ही पहिली वेळ नाही तर याआधी देखील मान्सूनचे 5 वेळा लवकर आगमन झाल्याची नोंद आहे.
आयएमडीच्या नोंदीनुसार, 1956 मध्ये, 29 मे रोजी मान्सून लवकर दाखल झाला होता.
1962 मध्ये, मुंबईत मान्सून 29 मे रोजी सुरू झाला होता.
त्यानंतर शहरात मान्सूनचे आगमन 29 मे 1971 रोजी झाले होते.
1990 मध्ये, मुंबईत मान्सूनचे आगमन 31 मे रोजी झाले होते.
त्यानंतर 31 मे 2006 रोजी मान्सूनचे आगमन झाले होते.
नैऋत्य मान्सून पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या अधिक भागांमध्ये, कर्नाटकचा काही भाग, संपूर्ण गोवा राज्य, महाराष्ट्राचा काही भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या प्रदेशांमध्ये पुढे सरकला आहे. मान्सूनची उत्तर सीमा (एनएलएम) आता देवगड, बेलागावी, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई आणि पुढे ईशान्येकडे ऐझॉल आणि कोहिमा मार्गे जाते.
25 मे ते 29 मे दरम्यान, आयएमडीने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या प्रदेशांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी वारे आणि वादळी वारे देखील येऊ शकतात.
हेही वाचा