Advertisement

मान्सून तीन दिवसांत मुंबईत दाखल होणार, उकाड्यापासून दिलासा

अशी भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे

मान्सून तीन दिवसांत मुंबईत दाखल होणार, उकाड्यापासून दिलासा
File photo
SHARES

नैऋत्य मान्सून येत्या ७२ तासांत मुंबईत दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केली आहे. मान्सूनने 11 जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता.

२३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची उंचीही वाढत आहे. त्यामुळे मध्य भारतातील बऱ्याचशा भागात मान्सूनचा पाऊस येणार असून त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. यामुळे उकाड्यातूनही सुटका होण्याची आशा आहे.

मान्सून सुरू होण्यास उशीर झाल्याबद्दल स्पष्टीकरण देताना, IMD पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, बिपरजॉय या चक्रीवादळाच्या निर्मितीमुळे या वर्षी मान्सूनची गती मंदावली आहे.

“मान्सून सामान्यत: केरळमध्ये 1 जूनपर्यंत पोहोचतो, या वर्षी तो 8 जूनला आला. चक्रीवादळाचा अडथळा येण्यापूर्वी तो गोवा आणि रत्नागिरीपर्यंत पोहोचला होता. परिणामी, 11 ते 18 जूनपर्यंत मान्सूनची प्रगती मर्यादित आहे,” ते म्हणाले.

मान्सून गेल्या आठवड्यात रत्नागिरीत दाखल झाला असला तरी पश्चिम आणि नैऋत्य वाऱ्यांमुळे तो जवळपास आठवडाभरापासून  दडी मारून आहे. अनुकूल परिस्थितीत, मान्सूनला रत्नागिरीहून मुंबईत पोहोचण्यासाठी साधारणपणे ४८ तास लागतात.

कश्यप पुढे म्हणाले की, पुढील 72 तासांत अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मान्सूनच्या हालचालींमध्ये वाढ होईल. त्यांनी मुंबई, पुणे, महाराष्ट्रातील दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि इतर प्रदेशात सक्रिय मान्सून प्रवाहाचा अंदाज वर्तवला. 23 जूनपासून मान्सूनची गती वाढण्याची IMD ला अपेक्षा आहे.

अधूनमधून पाऊस पडत आहे त्याचे श्रेय काही प्रमाणात चक्रीवादळाला दिले जाऊ शकते. परिणामी, उत्तर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात सध्या सुरू असलेला पाऊस मान्सूनच्या लक्षणीय प्रगतीचे संकेत देत नाही.

जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

या काळात देशासाठी चांगली स्थिती निर्माण होईल, असेही ते म्हणाले. सध्या पावसाची सरासरी ही मोठ्या प्रमाणावर तुटीची आहे. त्यामुळे पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल, असेही होसाळीकर यांनी सांगितले.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा