Advertisement

मोरबे धरण ओव्हरफ्लो, धरणाचे दरवाजे उघडणार

दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.

मोरबे धरण ओव्हरफ्लो, धरणाचे दरवाजे उघडणार
SHARES

नवी मुंबईला (navi mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो (overflow) होण्याच्या मार्गावर आहे.

धरणाची मालकी असलेली नवी मुंबई महानगरपालिकेने (nmmc) धरणातील जास्तीचे पाणी सोडण्यासाठी या आठवड्यात धरणाचे दरवाचे उघडणार असल्याचे सांगितले. या भागात येणाऱ्या पर्यटकांना सावध करण्यासाठी सावधगिरीचा एक भाग म्हणून प्रशासनाने स्थानिक तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचा इशाराही दिला.

धरण 88 मीटर उंचीवरून ओव्हरफ्लो झाले आहे. रविवारी दुपारपर्यंत सध्याची पाण्याची क्षमता 87.40 मीटरपर्यंत पोहोचली आहे. शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीपुरवठा होणार असल्याने मोरबे धरणाची पूर्ण क्षमता ही रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, असे महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले.

“मोरबे धरण (morbe dam) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी जवळपास पूर्ण क्षमतेने पोहोचली असून ते ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. पूर टाळण्यासाठी, जेव्हा पाण्याची पातळी 87.85 मीटरपर्यंत पोहोचते, तेव्हा फ्लॅप गेट लगेच उघडले जातात. 

अतिरिक्त पाणी धवरी नदीत सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले आहेत,” असे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, त्यांनी खालापूर तहसीलदार, स्थानिक पोलीस, सरपंच आणि इतर संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांना फ्लॅप गेट उघडण्याबाबत कळवले आहे. त्यामुळे या भागात अनेक पर्यटक येत असल्याने त्यांना खबरदारीचे उपाय करण्यास मदत होईल.

तसेच प्रशासनातर्फे पर्यटकांनी धवरी नदीजवळ जाऊ नये असे देखील सांगण्यात आले आहे. हे धरण रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ पाताळगंगा नदीपासून उगम पावणाऱ्या धावरी नदीवर आहे.

रायगड जिल्ह्यातील चौक गावाजवळ माथेरानच्या पायथ्याशी बांधलेले, मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे आहे. स्वातंत्र्यानंतर स्वतःचे धरण (dam) विकत घेतलेली ही एकमेव प्रशासन संस्था आहे.

धरणातील पाण्याची कमाल उंची 88 मीटर इतकी आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 190.89 दशलक्ष घनमीटर आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेकडून धरणातून दररोज 476.847 mld पाणी मिळते आणि त्यातून 415.40 mld शुद्ध पाणी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पुरवले जाते. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1,27,000 हून अधिक जलवाहिन्यांना पाणी पुरवठा केला जातो. 15 एमएलडी पाणी बागांसाठी आणि डिव्हायडरवरील झाडांना पाणी देण्यासाठी वापरले जाते. कामोठे नोड आणि मोरबे धरणाच्या आसपासच्या भागाला 37 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.



हेही वाचा

महाराष्ट्रात प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी

24 ऑगस्टला 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा