Advertisement

राज्यात २ लाखाहून अधिक पदं रिक्त

एकूण २९ शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या १० लाख ९९ हजार १०४ इतकी आहे.

राज्यात २ लाखाहून अधिक पदं रिक्त
SHARES

राज्य सरकारमध्ये २ लाखाहून अधिक पदं रिक्त असल्याचं माहिती अधिकारातून उघडकीस आलं आहे. राज्य सरकारमधील विविध शासकीय विभाग तसेच जिल्हा परिषदांमध्ये इतक्या मोठ्या संख्ये पदे रिक्त असल्याचं आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारातून समोर आणलं आहे.  

शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील ३१ डिसेंबर, २०१९ पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली. एकूण २९ शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या १० लाख ९९ हजार १०४ इतकी आहे. यापैकी ८ लाख ९८ हजार ९११ ही पदे भरलेली आहेत. तर २ लाख १९३ ही पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मागविली होती.

एकूण २९ विभागापैकी १६ विभागाची ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची माहिती उपलब्ध आहे. यात गृह विभागाची चार खाती, महसूल व वन विभागाची तीन खाती, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, सामाजिक व न्याय विभाग, नगरविकास विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, ग्रामविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मृद व जलसंधारण विभाग, गृहनिर्माण विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आहेत.

मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने ही रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा