Advertisement

मुंबईच्या 'या' परिसरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू


मुंबईच्या 'या' परिसरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावासोबतच मृतांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेच्या जी-उत्तर विभागात येणाऱ्या दादर-माहीममध्येही मृत्यूंची नोंद वाढते आहे. जी-उत्तरमध्ये आतापर्यंत ५३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील दादरमध्ये १३४, माहीममध्ये ११०, तर धारावीत २८८ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

या विभागातील ५३२ मृत्यूंपैकी २३० रुग्णांचा मेमध्ये मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू (१६१) धारावीतील होते. आता येथील मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आले. अत्यंत दाटीवाटीचा धारावी परिसर कोरोना रुग्णांचे आकडे आणि मृत्यूंची संख्या यामुळे सुरुवातीच्या काळात कायम चर्चेत राहिला होता.

परंतु, जूनमध्ये ९६, जुलैमध्ये ६५, ऑगस्टमध्ये ५३, तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे बहुतांश मृत्यू दादर-माहीम या मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांची सर्वाधिक संख्या असलेल्या भागात आहेत.

मुंबईत ‘के-पूर्व’ (विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व) भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. तोकडी वैद्यकीय सेवा, कोरोनाविषयीची भीती, रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्तीचा अभाव, दीर्घकालीन आजार आदी विविध कारणांमुळे मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनामुळे ‘के-पूर्व’ म्हणजे विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरीच्या पूर्व भागामध्ये सर्वाधिक म्हणजे ५६२ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याखालोखाल दादर, माहीम, धारावीचा समावेश असलेल्या ‘जी-उत्तर’ विभागात ५२४  तर भांडुपमध्ये ४९१, कुल्र्यामध्ये ४७५, घाटकोपरमध्ये ४३०, एल्फिन्स्टनमध्ये ४२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

‘के-पूर्व’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत सेवन हिल्स रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालय, करोना केंद्रे आहेत. तसेच ‘जी-उत्तर’ विभागातही छोटी-मोठी खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद तेथील विभागात झाली आहे. परिणामी या २ विभागांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी दिसत असल्याचं समजतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा