Advertisement

सरकारी कागदपत्रांवर आता आईचे नाव अनिवार्य

मंत्रिमंडळ बैठकीत 18 महत्त्वाचे निर्णय

सरकारी कागदपत्रांवर आता आईचे नाव अनिवार्य
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये आता सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

याशिवाय रेस कोर्सच्या 320 एकर जागेवर जागतिक दर्जाचे थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोस्टल रोडवरील 320 एकर आणि रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क विकसित करण्यावर चर्चा करण्यात आली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 18 निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

  • बी.डी.डी झोपडीधारक आणि झोपडीधारकांच्या भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्क कमी कणार
  • 58 बंद गिरण्यांमधील कामगारांना घरे दिली जाणार आहेत
  • एमएमआरडीए प्रकल्पांसाठी 24 हजार कोटी रुपयांची सरकारी हमी
  • मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी KFW कडून 850 कोटी रुपये
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र
  • जीएसटीमध्ये 522 नवीन पदांना मंजुरी
  • राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद
  • LLM पदवी धारण करणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळेल
  • विधी व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना
  • राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता निर्माण प्रकल्प
  • अयोध्येत महाराष्ट्र गेस्ट हाऊस बांधण्यासाठी भूखंड
  • मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क
  • सरकारी कागदपत्रांवर आता आईचे नाव अनिवार्य
  • उपसा जलसंचयन योजनेच्या ग्राहकांसाठी वीज दरात सवलत योजनेची मुदतवाढ
  • 61 अनुदानित आश्रमशाळांच्या श्रेणीवर्धनास मान्यता
  • आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना
  • राज्य तृतीयक धोरण 2024 ला मान्यता



हेही वाचा

दादर : छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील लाल माती काढली जाणार

टाटा पॉवरच्या वीज धारकांसाठी महत्त्वाची बातमी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा