Advertisement

संगणक परिचालकांचं पद निश्चितीसाठी बेमुदत आंदोलन


संगणक परिचालकांचं पद निश्चितीसाठी बेमुदत आंदोलन
SHARES

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये विविध २९ प्रकारचे ऑनलाईन दाखले देण्याचे काम करणारे हजारो संगणक परिचालकानी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन पुकारलं आहे. यासाठी हजारो संगणक परिचालक आझाद मैदानात उतरले आहेत. 


लाँग मार्चचा इशारा

संगणक परिचालक पद निश्चित करून माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती मिळावी या मागणीसाठी भायखळा ते आझाद मैदान असा लाँग मार्च काढण्याचा इशारा संगणक परिचालकांकडून देण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी त्यांची अडवणूक करत सर्व आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानात अाणलं. 


तुटपुंजे मानधन

राज्यातील २७ हजार ८६४ ग्रामपंचायती, ३५१ पंचायत समिती व ३४ जिल्हा परिषदेत एकूण २३ हजार ७३४ संगणक परिचालक आहेत. त्यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन दिलं जात आहे. ते तुटपुंजे मानधन वेळेत मिळत नसल्याची या परिचालकांची तक्रार आहे. संग्राम प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीचा आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला होता. भाजप सरकारने त्याच कंपनीला 'आपले सरकारचे' काम दिल्यामुळे आमची परवड होत असल्याचा परिचालकांचा आरोप आहे.


गंभीर आरोप

'आपले सरकार'सेवा केंद्राचे संचलन दिल्लीची 'सीएससी एसव्हीपी' कंपनी करते. त्या कंपनीकडून परिचालकांचे मानधन दिले जात नाही. स्टेशनरीचा पुरवठा वेळेत होत नाही, प्रशिक्षण दिले जात नाही, बोगस सॉफ्टवेअर पुरवली जातात असे अनेक गंभीर आरोप परिचालकांच्या संघटनेद्वरे करण्यात येत आहे.  


परिचालकांनी २०१५ आणि २०१६ मध्येही मुंबईत मोर्चे काढले होते. परंतु त्यावर कोणताही मार्ग न निघल्याने अखेर विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन पुकारलं आहे. आणि जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे .

- सिद्धेश्वर मुंडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनाहेही वाचा - 

ठाण्यातील महिलेचा न्यूझीलंडमध्ये संशयास्पद मृत्यू

माथाडी कामगार संघटनांचं काम बंद आंदोलन
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा