ठाण्यातील महिलेचा न्यूझीलंडमध्ये संशयास्पद मृत्यू


ठाण्यातील महिलेचा न्यूझीलंडमध्ये संशयास्पद मृत्यू
SHARES

ठाण्यातील एका विवाहित महिलेचा न्यूझीलंडमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सोनम शेलार असं या महिलेचं नाव आहे. न्यूझीलंडमधील वैरारापा नावाच्या समुद्रकिनारी सोनमचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


लग्नानंतर न्यूझीलंडला 

सोनम ही मुळची ठाण्यातील कोपरी येथील रहिवासी आहे. सोनमचं मागील वर्षी डिसेंबर महिन्यात  सागर शेलारशी लग्न झालं होतं. सागर हा शेफ असून तो न्यूझीलंडमध्ये हॉटेल क्षेत्रात कार्यरत आहे. सोनम लग्नानंतर न्यूझीलंडला स्थायिक झाली होती. 


अपघात की घातपात?

सोनम बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीनं वेलिंग्टन पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर न्यूझीलंडमधील वैरारापा बीचवर गार्डसना तिचा मृतदेह आढळून आला. हा अपघाती मृत्यू आहे की, घातपात याचा तपास वेलिंग्टन पोलिस करत अाहेत. हेही वाचा - 


26/11 स्पेशल: सुरक्षेतील सुस्तपणा धोक्याचा!

चाइल्ड पाॅर्नोग्राफी बघाल, तरी ५ वर्षे तुरूंगात जाल!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा