Advertisement

MSEDCl insurance cover: कोरोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख मिळणार

अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजावताना महानिर्मिती कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास या कर्मचाऱ्याच्या वारसांना ३० लाख रूपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

MSEDCl insurance cover: कोरोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख मिळणार
SHARES

अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजावताना महानिर्मिती कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास या कर्मचाऱ्याच्या वारसांना ३० लाख रूपयांचं सानुग्रह अनुदान (MSEDCl electrical staff will get 30 lakh rupees insurance cover in corona pandemic) देण्यात येईल. एवढंच नाही, तर महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसंच सुरक्षारक्षक यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.

कोरोना साथ प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधीत कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार डाॅक्टर-नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबतच पोलिस कर्मचारी, महापालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आलं. परंतु कोरोना संकटात जीव मुठीत घेऊन वीज पुरवठा अखंडीत राहावा म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं विमा संरक्षण नव्हतं. ही कमतरता आता भरून निघाली आहे.

हेही वाचा - Coronavirua Updates : बेस्टच्या कोरोनामृतांच्या वारसांना नोकरी

याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोरोनाचं संकट असताना देखील महानिर्मितीचे कर्मचारी जोखीम पत्करून वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अशा स्थितीत त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसंच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल.     

दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना काही प्रमाणपत्रं सादर करावी लागतील. त्यात संबंधित कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं कारण हे कोविड-१९ विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय/पालिका/महानगरपालिका/आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेलं असावं. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असं महानिर्मितीने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - कोरोना योद्ध्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा