Advertisement

हकालपट्टी झालेले राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत


हकालपट्टी झालेले राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत
SHARES

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर हकालपट्टी करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत दाखल झाले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी क्लिनचीट मिळाल्यानं मोपलवार यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आलं आहे. त्यानुसार मंगळवारी एमएमआरडीसीच्या व्यवस्थापकीय पदाचा पदभार आपण स्वीकारल्याची माहिती मोपलवार यांनी दिली आहे.


हकालपट्टीनंतर पुन्हा सेवत दाखल 

वादग्रस्त समृद्धी महामार्ग प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी मोपलवारांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर मोपलवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. अखेर ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोपलवार यांच्याविरोधात चौकशी लावत त्यांची हकालपट्टी केली.


मोपलवार यांना दिलासा

ऑडिओ क्लिपची तपासणी केली असता ऑडिओ क्लिपमध्ये छेडाछाड केल्याचा अहवाल राज्य सरकारच्या चौकशी समितीने काही दिवसांपूर्वी देत मोपलवार यांना दिलासा दिला होता. त्यानुसार मोपलवार यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आलं आहे.


हेही वाचा - 

मोपलवारांकडून मागितली १० कोटींची लाच, मांगले दाम्पत्याला अटक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा