Advertisement

एसटी कामगारांचा सामुहीक रजेवर जाण्याचा इशारा


एसटी कामगारांचा सामुहीक रजेवर जाण्याचा इशारा
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या जीवघेण्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एसटी कामगारांची तपासणी देखील होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याशिवाय मुंबई, ठाणे विभागातील एसटी कामगारांना एप्रिल महिन्याचा पगार न मिळाल्यानं संतप्त एसटी कामगारांनी २२ जुनपासून सामुहीक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणी एसटी कामगारांनी मुंबई आगार व्यवस्थापकांना निवेदन दिलं असून, त्याच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठवल्या आहेत.

मुंबई आगारात सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांची ९० टक्के उपस्थित असल्यानं सोशल डिस्टन्सिंगचे नियमांच पालन होत नाही. त्याशिवाय, मुंबई आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची भिती वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्याचं वेतन न मिळाल्यानं या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी महामंडळातील ७ कामगारांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तसंच, काहींना क्वारंटाईन आणि अनेक कर्मचाऱ्यांना संशयीत घोषीत करून रजेचे अर्ज देऊन सुट्टीवर घरी पाठवण्यात आले आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी चौकशी किंवा विचारपूस करण्यात आली नाही. त्यामूळं एसटी कामगारांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आगारातील सर्व कर्मचारी स्वतःची आरोग्य तपासणी करण्यासाठी २२ जुनपासून सामुहीक रजेवर जाणार असल्याचा इशारा  देण्यात आला. राज्यात सर्व एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांचं वेतन अदा करण्यात आलेले नाही. अशात राज्याचे मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, यांनी कामगारांचं वेतन देण्याचा निर्णय घेतला असतानाही एसटी महामंडळानं त्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप सुद्धा एसटी कामगारांनी केला आहे. मुंबई, ठाणे या विभागातील कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याने, कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आणि उद्रेक निर्माण झाला आहे.हेही वाचा -

मुंबईनजीकच्या ‘या’ शहरात पुढचे १५ दिवस कडक लाॅकडाऊन

एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीरसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा