Advertisement

मुंबईनजीकच्या ‘या’ शहरात पुढचे १५ दिवस कडक लाॅकडाऊन

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिवंडी शहरात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय भिवंडी-निजामपूर महापालिकेने घेतला आहे.

मुंबईनजीकच्या ‘या’ शहरात पुढचे १५ दिवस कडक लाॅकडाऊन
SHARES

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिवंडी शहरात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर (bnmc declared 15 days lockdown in bhiwandi from 18 june 2020) करण्याचा निर्णय भिवंडी-निजामपूर महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार १८ जून ते ३ जुलै २०२० पर्यंत भिवंडी शहर पूर्पणणे बंद असणार आहे. लाॅकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. 

भिवंडीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी भिवंडीत १५ दिवसांचा लाॅकडाऊन करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. परंतु या लाॅकडाऊनची नेमकी तारीख निश्चित नसल्याने रहिवाशांमध्ये काही प्रमाणात गोंधळ होता. त्यानंतर मंगळवार १६ जूनला भिवंडी-निजामपूर महापालिकेत महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासभेत लाॅकडाऊनच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेत शहरामध्ये गुरूवार १८ जूनपासून पुढील १५ दिवस कडक लाॅकडाऊन लागू करण्याचं एकमताने ठरवण्यात आलं. या लाॅकडाऊन अंतर्गत अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता शहरातील इतर सर्व दुकाने, कारखाने, गोदाम आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 

भिवंडीकरांच्या हितासाठी महासभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांसह सर्व नगरसेवकांनी पुढील १५ दिवस लाॅकडाऊन लागू करण्याच्या बाजूने मत दिलं आहे. तेव्हा शहरातील सर्व रहिवाशांनी या लाॅकडाऊनचं पालन करावं. तातडीची गरजेशिवाय रहिवाशांनी आपल्या घरातून बाहेर पडून नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी रहिवाशांना केलं आहे. 

मंगळवार १६ जून २०२० पर्यंत भिवंडी निजामपूर महापालिका परिसरात ६८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा - 

ठाण्यात ‘या’ ठिकाणी विशेष कोविड रुग्णालय सुरू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मिरा-भाईंदरमध्ये दोन नवीन कोरोना रुग्णालय, ८१९ पदांची भरती



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा