Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये दोन नवीन कोरोना रुग्णालय, ८१९ पदांची भरती

दोन नवीन रुग्णालयांमध्ये ३७६ खाटा उपलब्ध होणार आहेत. मात्र, या रुग्णालयांसाठी महापालिकेकडे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारीच नाहीत.

मिरा-भाईंदरमध्ये दोन नवीन कोरोना रुग्णालय, ८१९ पदांची भरती
SHARES
मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे  शहरात दोन नवीन कोरोना रुग्णालयांना राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या दोन्ही रुग्णालयांसाठी महापालिकेने ८१९ पदांसाठी भरती सुरु केली आहे.  या भरतीसाठी शनिवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 


दोन नवीन रुग्णालयांमध्ये ३७६ खाटा उपलब्ध होणार आहेत. मात्र, या रुग्णालयांसाठी महापालिकेकडे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारीच नाहीत. त्यामुळे महापालिकेने डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ८१९ पदं भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेच्या मीरा रोड येथील प्रमोद महाजन इमारत आणि मीनाताई ठाकरे इमारत याठिकाणी अनुक्रमे २०६ आणि १७० खाटांची कोविड रुग्णालये सुरु करण्यात येणार आहेत.  यासाठी शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याव्यतिरिक्त आणखी ४५० खाटांच्या रुग्णालयाला देखील लवकरच शासनाकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.

महापालिका  कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या कालावधीसाठी डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांची करार पद्धतीने नेमणूक करणार आहे. नियुक्ती ३ महिने किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असेपर्यंत असणार आहे. इच्छुकांनी येत्या २० जूनपर्यंत महापालिका मुख्यालयात अर्ज सादर करावेत, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

मीरा-भाईंदरमध्ये आठवडाभरात ६३२ नवीन रुग्ण

'ही' आहे मुंबईतील १७ जूनपर्यंतची कंटेन्मेंट झोन यादी

गैरहजर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुंबई पालिकेकडून ७२ तासांची नोटीस




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा