Advertisement

गैरहजर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुंबई पालिकेकडून ७२ तासांची नोटीस

२३ मार्चपासून कर्तव्यावर हजर न राहिलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिका पालिका प्रशासनाने आता हजर राहण्यासाठी ७२ तासांची नोटीस दिली आहे.

गैरहजर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुंबई पालिकेकडून  ७२ तासांची नोटीस
SHARES
२३ मार्चपासून कर्तव्यावर हजर न राहिलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिका पालिका प्रशासनाने आता हजर राहण्यासाठी  ७२ तासांची नोटीस दिली आहे. या कालावधीनंतरही गैरहजर राहणाऱ्यांवर सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कोरोनाविरोधात महापालिका रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र,   लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयामधील अनेक  वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर राहिलेले नाहीत. त्यांना पालिकेने तातडीने उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अनेक अधिकारी, कर्मचारी हजर झाले नाहीत. आता पालिकेने गैरहजर राहण्यांना पुन्हा एकदा ७२ तासांची नोटीस देण्यात दिली आहे. या कालावधीनंतरही गैरहजर राहणाऱ्यांवर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा जारी केले आहेत.

७२ तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कर्तव्यावर उपस्थित राहिले नाहीत तर त्यांना अनुपस्थितीसंदर्भातील खुलासा योग्य कारणासह सादर करावा लागणार आहे. पालिकेच्या वैद्यकीय परीक्षकांकडून शारीरिक स्वास्थ प्रणाणपत्र घेणे गरजेचे असेल तर या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्याचे अधिकार खाते प्रमुख, सहायक आयुक्त यांना आहेत. वैद्यकीय परीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी कोविडशी संलग्न कामामध्ये व्यग्र असतील तर ड्युटीवर उपस्थित होऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वयंघोषणापत्रामध्ये आजारी असल्याचा उल्लेख केला नसेल तर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात येऊ नये, असे निर्देश पालिकेने दिले आहेत. मात्र स्वयंघोषणापत्रामध्ये उल्लेख केलेली बाब खोटी आढळून आली तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वैद्यकीय परीक्षणास न पाठवण्याची सूट ही ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.


वय वर्षे ५५ वा त्यापक्षा अधिक वय असलेले सर्व कर्मचारी, अधिकारी यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस असे दीर्घ स्वरूपाचे आजार असतील तसेच दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांचीही रोगप्रतिकारशक्ती सामान्यांच्या तुलनेमध्ये चांगली नसल्यास त्यांना हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



हेही वाचा -

'ही' आहे वसई, विरार, नालासोपाऱ्यातील १७ जूनपर्यंतची कंटेन्मेंट झोन लिस्ट

कोरोनाग्रस्तांसाठी एमएमआरडीएचं दुसरं कोविड सुविधा केंद्र




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा