Advertisement

कोरोनाग्रस्तांसाठी एमएमआरडीएचं दुसरं कोविड सुविधा केंद्र


कोरोनाग्रस्तांसाठी एमएमआरडीएचं दुसरं कोविड सुविधा केंद्र
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेनं रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढविण्यासाठी सुरूवात केली आहे. तसंच, अनेक संस्थांनी कोरोनाग्रस्तांची गैरसोय होऊ नये यासाठी कोविड केंद्र देखील सुरू केले आहे. अशातच आता एमएमआरडीएनंही पुढाकार घेत कोविड केंद्र सुरू केलं आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे(एमएमआरडीए) दुसऱ्या कोविड उपचार सुविधा केंद्राचं काम पूर्ण झालं असून बुधवारी त्याचं महापालिकेकडं हस्तांतर होणार आहे.

मुंबई आणि उपनगरातील करोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्याचबरोबर विलगीकरण, अलगीकरणासाठी अतिरिक्त खाटांची गरज पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोविड सुविधा केंद्राचं काम सुरू करण्यात आलं होतं. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १ हजार खाटांचं केंद्र केवळ १५ दिवसांत बांधून पूर्ण करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालय उभारणीच्या कामास मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरुवात करण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यातील कोविड सुविधा केंद्रात १ हजार खाटांची सुविधा आहे. त्यापैकी १०० खाटांचा अतिदक्षता विभागदेखील आहे. गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा या रुग्णालयात असल्याची माहिती एमएमआरडीएनं दिली. तसंच, डायलिसिसची सुविधादेखील असून ९०० खाटांपैकी काही खाटांना ऑक्सिजन सुविधा देण्यात आली आहे.

पावसाळ्यात पाणी साचून केंद्रात येऊ नये यासाठी जमिनीपासून ९ इंचावर प्लायवूडचं फ्लोअरिंग करण्यात आलं आहे. ताशी ८० किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याला तोंड देण्याची क्षमता असलेल्या पीव्हीसी आच्छादनाचा वापर करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनदेखील २ कोविड दक्षता केंद्राची उभारणी करत असून, लवकरच ते काम पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

यापैखी एक केंद्र दहिसर चेक नाका इथं उभारण्यात येत असून, ऑक्सिजन सुविधा असणाऱ्या २०० खाटांसह एकूण ८०० खाटांचा अलगीकरण कक्ष असणार आहे. तसंच, दुसरं केंद्र कंदर पाडा, बोरिवली आरटीओ कार्यालयानजीक उभारण्यात येत आहे. यामध्ये २५० खाटांचं कक्ष असणार आहे. या केंद्रात गंभीर रुग्णांसाठी विशेष उपचार सुविधा, तसेच डायलिसिसची सुविधाही असणार आहे.हेही वाचा -

हळद, तुळस आणि कडुलिंबाचा वापर करून बनवलेलं बायोडिग्रेबल मास्क

लोकलसाठी सहन करावा लगतोय 'हा' त्रासRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा