कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन पाळण्यात आला. पण तरीही रुग्णांचा आकडा वाढतच आहे. आता काही भागांमध्ये सरकारनं लॉकडाऊन शिथिल केलं आहे. अनेक ऑफिसेस हळूहळू चालू होत आहेत. प
पण यासोबतच सरकारनं काही नियमावली जारी केली आहे. त्यात मास्क बंधनकारक हे नमूद केलं आहे. तुम्ही कुठेही गेलात तरी मास्क हे असलंच पाहिजे. बाजारात वेगवेगळे मास्क उपलब्ध आहेत. पण सुरुवातीला वापरलेल्या मास्कची विलेवाट कशी लावायची? हा प्रश्नच निर्माण झाला होता. पण आता बाजारात बऱ्यापैकी पर्यावरण मास्क पुरवले जात आहेत. त्यापैकीच एक मास्क पुण्याच्या डिफेंस इंस्ट्टियूट ऑफ अॅडवांस्ड टेक्नोलॉजी (DIAT) बनवल्याचा दाला केला आहे.
डिफेंस इंस्ट्टियूट ऑफ अॅडवांस्ड टेक्नोलॉजीनं दावा केला आहे की, त्यांनी औषधीय पदार्थांच्या वापरातून कापसाचा मास्क तयार केला आहे, हा मास्क व्हायरसला नष्ट करू शकतो. डीआयएटीच्या डिपार्टमेंट ऑफ मेटलर्जी अॅड मेट्रियल इंजीनियरिंगचे प्राध्यापक बाला सुब्रमण्यन के. यांनी सांगितलं की, मास्कला बनवण्यासाठी कडुलिंबाचे तेल, हळद, तुळस, अजवाइन, काळी मिर्ची, लोबान, लवंग, चंदन आणि केसरचा वापर झाला आहे.
तीन लेयरच्या या मास्कमध्ये या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. या मास्कला 'पवित्रपती' नाव दिलं आहे. हा मास्क बायोडिग्रेडेबल (नैसर्गिक पद्धतीनं नष्ट होणारा) आहे. त्यांनी सांगितलं की, हा मास्क विषाणूला नष्ट करू शकतो. तसंच औषधीय पदार्थ असल्यानं आयुष मंत्रालयाच्या दिशा-निर्देशांनुसार, रोग प्रतिकार शक्तीला वाढवतो.
हेही वाचा