Advertisement

हेल्थकेअर सप्लाय चेन पोर्टल ‘आरोग्यपथ’ लाँच

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात केंद्रानं हेल्थकेअर सप्लाय चेन पोर्टल ‘आरोग्यपथ’ लाँच केलं आहे.

हेल्थकेअर सप्लाय चेन पोर्टल ‘आरोग्यपथ’ लाँच
SHARES

कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारनं आरोग्य सेतू अप सुरू केलं. आता कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात केंद्रानं हेल्थकेअर सप्लाय चेन पोर्टल ‘आरोग्यपथ’ लाँच केलं आहे. अनेकदा कोरोनासाठी पालिकेकडून देण्यात येणारी औषधं, पीपीई किट्स, मास्क आदी वस्तू कुठून खरेदी करायच्या या संदर्भात माहिती नसते.

पण आता या पोर्टलमुळे अनेकांच्या समस्येचं निवारण होणार आहे. उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांना त्वरित अत्यावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चनं (सीएसआयआ) १२ जूनला हे पोर्टल लाँच केलं आहे. औषधापासून ते पीपीई किटपर्यंत अनेक सेवा या पोर्टलवर मिळतील.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार, या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू ओळखणे आणि पुरवठादारांपर्यंत पोहचणाऱ्या वस्तूंची माहिती मिळेल. याशिवाय उत्पादक आणि पुरवठादार जवळील पॅथोलॉजिकल लॅब्रोटरी, मेडिकल स्टोर्स आणि हॉस्पिटल इत्यादींद्वारे ग्राहकांना मदत पोहचवतील.

सीएसआयआरला आशा आहे की या पोर्टलद्वारे लोकांपर्यंत पोहचणाऱ्या आरोग्य सेवेसाठी लागणारा वेळ कमी होईल. याद्वारे ग्राहकाची मागणी आणि नवीन उत्पादनांमुळे व्यवसायाची संधी देखील वाढेल.



हेही वाचा

मुंबईत 'ह्या' विभागांमध्ये 'इतका' आहे रुग्ण दुपटीचा कालावधी

वातावरणात बदल; सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा