Advertisement

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक

देशात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४ झाली. यापैकी १ लाख ६९ हजार ७९७ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक
SHARES
देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५१. ७ टक्के झालं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४ झाली. यापैकी १ लाख ६९ हजार ७९७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ५३ हजार १०६ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.


महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के आहे. राज्यात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे.  ५६ हजार ४९ रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात सोमवारी तीन हजार ३९० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या एक लाख सात हजार ९५८ झाली आहे. तर १२० जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तीन हजार ९५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 देशात एका दिवसात आठ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. तर  कोरोनाची लागण झालेले  ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले. सोमवारी  ३२५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९५२० रुग्ण या आजाराने दगावले आहेत. कोरोना रुग्ण संख्येत जगात भारत आता चौथ्या क्रमांकावर पोचला आहे. 

राज्यात सध्या ५ लाख  ८९ हजार  १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा