Advertisement

मुंबईत 'ह्या' विभागांमध्ये 'इतका' आहे रुग्ण दुपटीचा कालावधी

दहिसर, बोरिवली, कांदिवली, मुलुंड, भांडुप या भागांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत.

मुंबईत 'ह्या' विभागांमध्ये 'इतका' आहे रुग्ण दुपटीचा कालावधी
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २७ दिवसांवर गेला आहे. यापूर्वी हा कालावधी 25 दिवस होता. मुंबईत रोज दीड ते दोन हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. रोजचा रुग्णवाढीचा दर सरासरी २.६५ टक्के आहे. 

एम पूर्व आणि एफ उत्तर या विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 55 च्या वर पोहोचला आहे. तर एम पूर्वेचा 53 वर पोहोचला आहे. जी उत्तर आणि एच पूर्वमध्ये हा कालावधी 48 आहे. ई विभागात तो 46 वर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दहिसरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सर्वात कमी म्हणजे ११ दिवस आहे. रुग्णवाढीचा वेग दहिसरमध्ये सर्वाधिक ६.४ टक्के आहे.

दहिसर, बोरिवली, कांदिवली, मुलुंड, भांडुप या भागांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत.  तर वांद्रे, धारावी, दादर, माहीम, कुर्ला या भागांतील रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. येथील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४० दिवसांपेक्षा जास्त आहे. भायखळा, नागपाडा परिसरातील रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे.

 बोरिवलीमध्ये रुग्ण वाढत असून या ठिकाणी १५५१ रुग्ण आहेत.  के पूर्व (अंधेरी पूर्व) मध्ये कोरोना आकडा ४०७६ झाला आहे. रुग्णसंख्येत के पूर्व हा भाग सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या भागात १६९६ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले असून सध्या २२०६ रुग्ण आहेत.

पालिकेकडे सध्या 50 हजारांहून  जास्त बेड उपलब्ध आहेत. 10 हजार 400 बेड पालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. यामध्ये पुढील दहा दिवस प्रतिदिन 300 आयसीयू बेड वाढवण्यात येणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत 168 ठिकाणी डायलिसिसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.  कोरोना विरोधातील लढय़ात लवकरच  यशस्वी होऊ असा  विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.



हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा