Advertisement

वातावरणात बदल; सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढ


वातावरणात बदल; सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मेडिकल स्टोअर्समधून सर्दी, ताप, खोकला आणि घसा दुखीच्या औषधांना मागणी वाढली आहे. त्यामुळं अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गोळ्या-औषधांचा रेकॉर्ड ठेवणं अनिवार्य असल्यानं कागदोपत्री रेकॉर्ड ठेवला जातो प्रत्यक्षात मात्र औषधांचा पुरवठा कमी झाला असल्याचं ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

मुंबईसह राज्यभरात पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशात पावसाळा म्हणजे संसर्गजन्य आजारांना आमंत्रण असतं. त्यामुळं खबरदारीचा उपया म्हणून सध्या सर्दी, खोकला, घशात खवखव आणि तापाची लक्षणं जाणवताच नागरिकांनी मेडिकल मधून औषधे घेण्यास सुरुवात केली आहे. 

डोकेदुखी, खोकला, अंगदुखी, शिंका, घशाची खवखव असे त्रास एरव्ही अनेकांना होत असतात. अशा रुग्णांना गरजेनुसार डॉक्टर ही औषधे देत असतात. सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणं दिसली तरी त्याचा संबंध कोरोनाशी असेलच असे नाही. पण, सध्या कोरोना संसर्गाचा लक्षात घेता सर्व नागरिक ही औषधे खरेदी करत आहेत. त्यामुळं सध्या खोकल्याची, अँझिथ्रोमाईसीन, पॅरासीटँमोल अशा औषधांची मागणी वाढली आहे.

अनेकदा डॉक्टराच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकत घेतली जातात. पावसामुळं या औषधांना अचानक मागणी वाढली असून, केमिस्ट चालक ही अतिरिक्त मालाची मागणी करत आहेत. ज्या केमिस्टमध्ये औषधांची कमतरता आहे ते केमिस्ट चालक मागणीनुसार दोन ते तीन दिवसात औषध उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, संघटनांची मागणी

मुंबई विमानतळावरून दररोज १०० विमानांची वाहतूक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा