Advertisement

बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, संघटनांची मागणी

बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी बँक संघटनांकडून करण्यात आली आहे.

बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, संघटनांची मागणी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकाडाऊन करण्यात आल्यामुळं मागील जवळपास अडीच महिने मुंबईची लाइफलाइन बंद होती. परंतु, सोमवारी पुन्हा मुंबईची लोकल रुळावर आली. या लोकलनं पहिल्याचं दिवशी ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, अनेक नियम व अटी तसंच, सर्वच प्रवाशांना प्रवासाची परवानगी नसून महापालिका, पोलिस, बेस्ट अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक असलेल्या बँक, पोस्ट, प्रसारमाध्यम आदी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना मात्र सोमवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेचा प्रवास नाकारण्यात आला. त्यामुळं बँक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी बँक संघटनांकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघाने (MSBEF) राज्य सरकारला पत्र लिहून याबाबत मागणी केली आहे. ‘बँक कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवासाची परवानगी द्यावी, त्यामुळं त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येईल. तसंच त्यामुळं पूर्ण क्षमतेनं बँक सेवा सुरू ठेवता येईल’ अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आल्याची माहिती एका वत्तवाहिनीनं दिली आहे.

रेल्वे प्रशासनानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. मात्र, अत्यावश्यक सेवांच्या यादीत समावेश नसल्यामुळं बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलनं प्रवास नाकारण्यात आला. लॉकडाउनदरम्यान बँकांनी अखंडित सेवा देण्याची अपेक्षा सरकारकडून केली जाते. त्यामुळं बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही लोकलनं प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी केल्याचं समजतं.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी निश्चित वेळेत पोहोचता यावं यासाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू करण्यात आली. पण अत्यावश्यक असलेल्या बँक, पोस्ट, प्रसारमाध्यम आदी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना सोमवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेचा प्रवास नाकारण्यात आला. त्यामुळं रेल्वेसेवेच्या पहिल्याच दिवशी या कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आणि त्यांना पुन्हा एसटी किंवा बसने प्रवास करावा लागला.



हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा