Advertisement

ठाण्यात ‘या’ ठिकाणी विशेष कोविड रुग्णालय सुरू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी उभारण्यात आलेल्या विशेष कोविड-१९ रुग्णालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवार १७ जून रोजी २०२० ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं आहे.

ठाण्यात ‘या’ ठिकाणी विशेष कोविड रुग्णालय सुरू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
SHARES

ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी उभारण्यात आलेल्या विशेष कोविड-१९ रुग्णालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवार १७ जून रोजी २०२० ऑनलाईन लोकार्पण (maharashtra cm uddhav thackeray inaugurates special covid 19 hospital at thane balkum) करण्यात आलं आहे. हे कोविड रुग्णालय सुरू झाल्याने आता कोरोनाग्रस्तांवर या ठिकाणी उपचार करता येणार आहे. 

या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळेस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के इ. उपस्थित होते.

ठाण्यातील बाळकुम भागात हे विशेष कोविड १९ रुग्णालय उभारण्यात आलं आहे. ठाणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे महापालिका, एमएमआरडीए, सिडको, क्रेडाई (एमसीएचआय) ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल इम्पॅक्ट हब, बाळकुम इथं हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे. अवघ्या २४ दिवसांत युद्धपातळीवर हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयाच्या उभारणी प्रक्रियेत ज्युपिटर रुग्णालयाने तांत्रिक सहाय्य केलं असून एल.अँड टी. कंपनीने २५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत.

हेही वाचा- धक्कादायक! फेरपडताळणीत मुंबईसह राज्यात १३२८ आणखी कोरोनामृत्यू

ठाणे कोविड-१९ रूग्णालयातील एकूण १०२४ खाटांपैकी ५०० खाटांना सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा पुरवण्यात आलेली आहे. यातील ७६ खाटा या आयसीयूच्या असून १० खाटा डायलिसिस रूग्णांसाठी तर १० खाटा ट्रॉमासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. आवश्यकता वाटल्यास या रूग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० खाटा निर्माण करता येऊ शकतात. 

ठाणे कोविड-१९ रुग्णालयात कोविड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. रूग्णांना युनिफार्म, पॅथालॉजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टिंग लॅब आणि मनोरंजनासाठी टीव्ही तसंच लॉकर्सचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे १००० किलोवॅट क्षमतेची जनरेटर्सची सुविधा देखील इथं उपलब्ध आहे.

तत्पूर्वी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचाराधीन घेत त्याविषयी ठाणे मनपा वतीने घेण्यात येणार्‍या उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व कोरोनाबाधित रुग्णांना मिळणाऱ्या उपचाराबाबत कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही,असा इशारा एकनाथ शिंदे यांनी मनपा प्रशासनाला दिला.

ठाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोमवार १५ जून २०२० पर्यंत २६५१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. तर २४८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. 

हेही वाचा- कोरोना मृत्यूचे आकडे लपवणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा