Advertisement

‘अशी’ बघता येईल आतून महापालिकेची हेरीटेज इमारत

बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत (Guided Heritage Walk) बृहन्मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

‘अशी’ बघता येईल आतून महापालिकेची हेरीटेज इमारत
SHARES

बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत (Guided Heritage Walk) बृहन्मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. पर्यटन मंत्री आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात झाला. (mtdc guided heritage walk for bmc heritage building in mumbai)

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिववल्सा नायर – सिंह आदी उपस्थित होते.

पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, मुंबई महापालिकेची इमारत ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर या इमारतीचं स्थापत्य, त्यातील तैलचित्रे, पुतळे यांचंही एक वेगळे महत्त्व आणि सौंदर्य आहे. पर्यटकांनी हे पाहिलं पाहिजे, पण त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकरांनीही आवर्जून पहावी अशी ही वास्तू आहे. मुंबईला २४ तास कार्यरत ठेवणारं महापालिका प्रशासन कसं काम करतं हे पाहणं वेगळा अनुभव देणारं आहे, असं ते म्हणाले. मुंबईच्या पर्यटनवाढीसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या विकासासह इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय पर्यटनासाठी आवश्यक असून त्याला चालना देण्याकरिता आदरातिथ्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या परवाने किंवा परवानग्यांची संख्या आता ७० वरुन फक्त ९ या एकअंकी संख्येवर आणली आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा- एरंगल समुद्रकिनारा पर्यटन क्षेत्र म्हणून होणार विकसित

पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, वानखेडे स्टेडियमच्या हेरीटेज वॉकसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर एकाच आठवड्यात महापालिका इमारतीच्या हेरीटेज वॉकसाठी हा सामंजस्य करार करण्यात येत आहे. या करारामुळे मुंबईच्या पर्यटनास चालना मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी चालवणारी मुंबई महापालिका कसे काम करते हे पाहणं पर्यटकांसाठी निश्चितच आनंददायी असेल, असं त्यांनी सांगितलं.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या असलेल्या महापालिका इमारतीत काम करण्याची संधी माझ्यासाठी बहुमोल ठरली. पर्यटकांसह सामान्य मुंबईकरांनाही या इमारतीबाबत मोठे आकर्षण आहे. महापालिका प्रशासन कसं चालतं याबाबत सामान्यांना नेहमीच आकर्षण असतं. या सामंजस्य करारामुळे पर्यटकांसह मुंबईकरांनाही आता ही इमारत पाहण्याची संधी मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- मुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा