Advertisement

एरंगल समुद्रकिनारा पर्यटन क्षेत्र म्हणून होणार विकसित

एरंगाल किनारपट्टीवरील अक्सा बीच आणि मार्वे किनारपट्टी देखील पर्यटकांचे आकर्षण आहे.

एरंगल समुद्रकिनारा पर्यटन क्षेत्र म्हणून होणार विकसित
SHARES

मुंबईतील मालाडमध्ये स्थित एरंगल बीच आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल. एरंगल बीचची जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. एरंगाल किनारपट्टीवरील अक्सा बीच आणि मार्वे किनारपट्टी देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. 

या किनाऱ्यांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. सरकारनं एरंगल बीटीच्या एमटीडीसी अंतर्गत भूखंडावर पुरेशी पर्यटन केंद्रं बांधल्यास सरकारला आर्थिक फायदा होईल. तिथं मोठ्या संख्येनं पर्यटक येतील. या तीन समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या स्थानिक वसाहतींना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील.

महाराष्ट्र शासनानं आता हा समुद्रकिनारा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार असलम शेख यांनी काही दिवसांपूर्वी या भागाला भेट दिली होती. विरार, वसई, बदलापूर, पालघर ते दक्षिण मुंबई ते नागरीक एरंगल बीचच्या प्रसिद्ध जत्रेतही येतात.

पर्यटन केंद्राच्या सुविधांचा विकास झाल्यास नागरिक त्याचा पुरेपूर फायदा घेतील. यासह सुट्टीच्या दिवसात या किना-यांवर लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते.



हेही वाचा

मुंबईतील ‘या’ जुन्या इमारतीतील रहिवाशांचं होणार पुनर्वसन

२ टक्के लोकं कळत-नकळतपणे मुंबईकरांना मारत आहेत- महापौर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा