मुलुंड जिमखान्याला पालिकेचा दणका

 Mulund
मुलुंड जिमखान्याला पालिकेचा दणका

मुलुंड - येथील जिमखान्याकडे देखभाल करण्यासाठी दिलेला तब्बल पाच हजार चौरस मीटर भूखंड पालिकेच्या टी विभागाकडून काढून घेतला जाणार आहे. या संबंधी नोटीस मुलुंड जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी पालिकेकडून देण्यात आली आहे. गुरुवारी पालिका या भूखंडाचा ताबा घेणार आहे.

निवडणुकांच्या कालावधीत या मैदानावर मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडही मारली होती. यानंतर सामान्य जनतेसाठी असलेल्या मोकळ्या मैदानाचा मनमानी वापर मुलुंड जिमखान्याचे पदाधिकारी करीत असल्याचे समोर आले होते. खरे तर दत्तक तत्वावर देण्यात आलेल्या मैदानांवर संबंधित संस्थांनी लोकांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि मैदानाच्या विकासासाठी कार्य करणे गरजेचे होते. परंतु प्रतिष्ठित व्यक्ती मुलुंड जिमखान्याचा पदाधिकारी असल्याने या ठिकाणी पालिकेच्या कोणत्याही परवानग्या न घेता मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचे आरोप होत होते. गेल्या वर्षी चक्क या ठिकाणी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता भव्य लग्न सोहळाही पार पडला होता. हा भूखंड सामान्य नागरिकांसाठी खुला ठेवणे गरजेचे होते. परंतु मुलुंड जिमखान्याचे कुंपण टाकून ही जागा फक्त सभासदांसाठी खुली ठेवली होती. या बाबत विभागातून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यात २५ तारखेला घडलेल्या पार्टीच्या प्रकारामुळे मुंबई महानगर टी विभागाने अखेर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

Loading Comments