Advertisement

मुलुंडमध्ये सोसायटीत राबववली लसीकरण मोहीम

सुमारे ७२० फ्लॅट्स असलेल्या या मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये दोन दिवस लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

मुलुंडमध्ये सोसायटीत राबववली लसीकरण मोहीम
SHARES

मुलुंड पश्चिम भागात स्थित अ‍ॅमटोस्फियर सोसायटीत बुधवारी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. फोर्टिस हॉस्पिटलच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात आली.

अहवालानुसार, सुमारे ७२० फ्लॅट्स असलेल्या या मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये दोन दिवस लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सुमारे ६०० लोकांना लसीकरण करण्याचं त्यांचं उद्दीष्ट होतं. तथापि, पहिल्या दिवशी सुमारे २५० रहिवाशांना रोगप्रतिबंधक लस टोचण्यात आली होती.

मोहीम राबवणाऱ्या रहिवाशांनी सांगितलं की, ही लसीकरण मोहीम यशस्वी पार पडली. कुठलाही त्रास झाला नाही. कारण सर्व सदस्यांना आधीच माहिती देण्यात आली होती. दरवाज्यावरील लसीकरणासाठी प्रत्येक रहिवाश्यांकडून प्रति डोस १ हजार ०५० शुल्क आरले गेले होते.

दरम्यान, जसलोक रुग्णालयाने बुधवारी, २६ मे रोजी वरळी इथं आदित्य बिर्ला समूहाच्या कर्मचार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबवली. रुग्णालयानं कर्मचार्‍यांना कोविशल्ड लसीचा डोस ९३० दरानं दिला.

तथापि, गोरेगावची गोखलधाम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ऑफिसर्स क्वार्टर्स खासगी कोविड लसीकरण केंद्र (पीसीव्हीसी) च्या सहकार्यानं दारात लसीकरण करणारी शहरातील पहिली गृहनिर्माण संस्था ठरली आहे. सुमारे ४०० रहिवाशांना कोवाक्सिन डोस मिळाले. दुसर्‍या दिवशी एका मुलुंड सोसायटीलाही कोवाक्सिनचे डोस मिळाले.

शिवाय, हे निदर्शनास आले आहे की अनेक कॉर्पोरेट आणि गृहनिर्माण संस्था रुग्णालयात गेले आहेत आणि त्यांना त्यांच्या आवारात लसीकरण मोहीम करण्यास सांगितलं आहे.



हेही वाचा

नवी मुंबईत दिव्यांगांचं रांग न लावता होणार लसीकरण

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा