हिऱ्यांच्या व्यापाराचे एअर इंडियाचे मुख्यालय मुंबईतून (mumbai) हलवण्यात आले होते. तसेच आता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मुख्यालय दिल्ली (delhi) येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
गेल्या 50 वर्षांपासून मुंबईतील (सध्या अँटॉप हिल) या मुख्यालयात परदेशातून सरासरी एक लाखाहून अधिक पेटंट (patent) मंजुरीसाठी येतात. पेटंट मुख्यालय दिल्लीला हलविल्याने, मुंबईचे महत्त्व कमी होईल, असे म्हटले जात आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क मंत्रालयाचे (CGPDTM) मुख्यालय सध्या जगातील उद्योजकांच्या नवीन शोधांना मान्यता देण्यासाठी जगाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वडाळा अँटॉप हिल येथे आहे. काही वर्षांपूर्वी हे मुख्यालय मुंबईतील परळ येथे होते.
1970 च्या दशकात देशातील सहा प्रमुख शहरांमध्ये पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क मंजुरीसाठी कार्यालये स्थापन करण्यात आली होती.
या ठिकाणी देशातून तसेच परदेशातून एक लाखांपर्यंत पेटंटसाठी अर्ज येतात. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे मुख्यालय दिल्लीला हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरुवातीला हे मुख्यालय अहमदाबाद येथे हलवण्यात येणार होते. परंतु राजकीय विरोध पाहता डिसेंबरमध्ये दिल्लीतील द्वारका भवन येथे मुख्यालय हलवण्याचा आदेश देण्यात आला. तीन महिन्यांत हे मुख्यालय हलवण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यालयात 240 अधिकारी आणि कर्मचारी आहेत. मुंबईतील मुख्यालयात पेटंट देण्याची प्रक्रिया खूप कडक आहे. यासाठी, पेटंट तपासणी प्रक्रियेला 32 महिन्यांचा कालावधी लागतो.
मुख्यालय मुंबईहून दिल्लीला हलवल्याने अनेक समस्या निर्माण होतील. पेटंट जारी करण्याव्यतिरिक्त, दोन पेटंटमधील वाद सोडवण्याचे काम या मुख्यालयात केले जाते. पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्कबद्दल धोरणात्मक निर्णय या मुख्यालयात घेतले जातात.
हेही वाचा