मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने (SGNP) शनिवारी अंतर्गत वाहतुकीसाठी 10 इलेक्ट्रिक बग्गी (ई-बग्गी) चा ताफा लाँच केला आहे. या बग्गी स्थानिक आदिवासी महिला चालवतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्यावतीनं पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. या भागात ई बग्गी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
पर्यटकांना उद्यानात स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचं वनमंत्री म्हणाले.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, 'आलेल्या पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्वच्छ, शांत आणि प्रदूषमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ही खास सेवा सुरू करण्यात आली आहे. या हरित उपक्रमाला नागरिकांच्या सहभागातून अधिक बळ मिळेल, असे उद्यान प्रशासनाने आवाहन केले आहे', असं नाईक म्हणाले.
ई वाहनाबाबत गणेश नाईक म्हणाले, 'नॅशनल पार्कमध्ये पूर्वी पेट्रोलच्या गाड्या होत्या. आता इलेक्ट्रिक वाहन आणल्या आहेत. या इलेक्ट्रिक वाहन स्थानिक महिलांना देण्यात आल्या आहेत. यातून पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल', असं वनमंत्री गणेश नाईक म्हणाले. 'भविष्यकाळात नॅशनल पार्क जनतेच्या सेवेकरिता कायम तत्पर राहिल. इथल्या अडचणी लवकर सोडवल्या जातील', असंही नाईक म्हणाले.
नवीन इलेक्ट्रिक वाहने पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत, ज्यामुळे उद्यानातील कार्बन उत्सर्जन आणि ध्वनी प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होते. पारंपारिक वाहतुकीपेक्षा, या बग्गी पर्यटकांना उद्यानाचा शोध घेण्यासाठी शांत, स्वच्छ मार्ग देतात. तसेच वन्यजीवांना कमीत कमी त्रास देखील देतात.
एक अग्रगण्य पाऊल म्हणून, जवळच्या समुदायातील आदिवासी महिला बग्गी चालवत आहेत. यामुळे त्यांना केवळ रोजगार मिळाला नाही तर स्थानिक समुदायांना उद्यानाच्या संवर्धन प्रयत्नांमध्ये समाविष्ट केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा