मुंबईतील सर्व विभागांमध्ये १२ दिवसांसाठी १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमधील न्युमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर्स बदलण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईतील सर्वच भागात पाणीकपात होणार आहे.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार 20 नोव्हेंबर 2023 ते शनिवार 2 डिसेंबर 2023 या कालावधीत ही पाणीकपात केली जाईल.
या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबई आणि मुंबई महापालिकेकडून ठाणे, भिवंडी महापालिकेला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सोमवार 20 नोव्हेंबर 2023 ते शनिवार 2 डिसेंबर 2023 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात केली जाणार आहे. ठाणे आणि भिवंडी महापालिका हद्दीतील भागांना मुंबई महापालिका पाणीपुरवठा करते.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्व विभागातील नागरिकांनी वरील कालावधीत पाणीकपातीच्या एक दिवस आधी आवश्यक पाण्याचा साठा ठेवावा, असे बीएमसीने म्हटले आहे.
तसेच पाणीकपातीच्या काळात पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्व विभागातील नागरिकांनी वरील कालावधीत पाणीकपातीच्या एक दिवस आधी आवश्यक पाण्याचा साठा ठेवावा, असे बीएमसीने म्हटले आहे. तसेच कर्फ्यूच्या काळात पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा
दहिसरमध्ये मॅनग्रोव्ह पार्क आणि इको-टूरिझम सेंटर सुरू होणार