Advertisement

मुंबईत एक दिवसासाठी 15 टक्के पाणी कपात!

पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन

मुंबईत एक दिवसासाठी 15 टक्के पाणी कपात!
SHARES

19 मार्च रोजी एक दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्‍या पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के पाणीकपात केली जाणार आहे. पिसे येथील बांधावरील गेटच्या 32 पैकी एका रबरी ब्लाडर मधे  शनिवार 16 मार्च  रोजी अचानक बिघाड झाल्‍याने पाणी गळती सुरू झाली होती. या ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी 31 मीटर पर्यंत खाली आणण्यात आली. यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्‍तीचे काम सोमवार 18 मार्च सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  युद्धपातळीवर पूर्ण केले. 

दुरुस्तीची कामे सुलभ करण्यासाठी धरणाची पाणीपातळी 31 मीटरपर्यंत खाली आणावी लागली. त्यासाठी भातसा जलाशयातून होणारा पाणीपुरवठा नियमित करण्यात आला. रबर ब्लॅडरची दुरुस्ती करण्यात आली असली तरी पांजरपोळ येथील ट्रीटमेंट प्लांटद्वारे मुंबईला पाणी उपसण्यासाठी धरणाची पाणीपातळी अपुरी आहे. भातसा जलाशयातून पाणी सोडण्यात आले आहे, मात्र पिसे धरणापासून त्याचे 48 किलोमीटरचे अंतर पाहता पाणी पोहोचण्यास व धरणाची पातळी पुरेशा प्रमाणात आणण्यास वेळ लागण्याची अपेक्षा आहे.

यानंतर भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले. असे असले तरी बंधाऱ्याची पाणी पातळी पूर्ववत होण्‍याकरिता कालावधी लागणार आहे. यासाठी भातसा धरणातून सोडण्‍यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्‍ये साठविले जाते. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशया मार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. 

बंधा-याची पाणीपातळी पूर्ववत होईपर्यंत म्‍हणजेच मंगळवार, 19 मार्च रोजी म्हणजे एक दिवस पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के कपात करण्‍यात येणार आहे. नागरिकांनी पाण्‍याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवार, 19 मार्च 2024 रोजी नियोजित केलेल्या 15% पाणीकपात व्यतिरिक्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेने भांडुप संकुलातील मान्सूनपूर्व देखभालीच्या कामामुळे 24 एप्रिल 2024 पर्यंत 5% पाणीकपात जाहीर केली आहे.हेही वाचा

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई लोकलमध्ये करण्यात आले मोठे बदल

'12th Fail'चे मनोज कुमार शर्मा यांची महाराष्ट्र पोलिस IG पदावर वर्णी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा