Advertisement

'12th Fail'चे मनोज कुमार शर्मा यांची महाराष्ट्र पोलिस IG पदावर वर्णी

मनोज कुमार शर्मा यांच्या संघर्षावर 12th Fail चित्रपट साकारण्यात आला होता. यात त्यांचा IPS होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

'12th Fail'चे मनोज कुमार शर्मा यांची महाराष्ट्र पोलिस IG पदावर वर्णी
SHARES

नुकत्याच आलेल्या 12वी फेल या चित्रपटाने चर्चेत आलेल्या आयपीएस मनोज शर्माचे आता प्रमोशन करण्यात आले आहे. मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक (डीआयजी) वरून महानिरीक्षक (आयजी) पदावर बढती देण्यात आली आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) 2003, 2004 आणि 2005 बॅचच्या IPS अधिकाऱ्यांच्या पदोन्नतींना मंजुरी दिली होती. नुकताच प्रदर्शित झालेला 12वी फेल हा चित्रपट आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे.

अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले मनोज शर्मा बारावीत नापास होऊनही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आयपीएस अधिकारी बनण्याचा त्यांचा प्रवास हा चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रमोशन मिळाल्याची माहिती देखील शेअर केली आणि याबद्दल आपल्या हितचिंतकांचे आभार मानले.

केंद्र सरकारने 2003, 2004, 2005 बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनोज शर्मा यांचे नाव आहे. मनोज शर्मा यांनी यासंदर्भातील माहिती देताना ट्विटरवर म्हटले, “एसपी’पासून सुरू झालेला प्रवास आज ‘आयजी’ होण्यापर्यंत पोहोचला. या प्रदीर्घ प्रवासात साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.”

मनोज शर्मा यांनी याआधी महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर तसेच मुंबईसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे.

मनोज शर्मा यांची पदोन्नती हा त्यांचा वैयक्तिक विजय तर आहेच, शिवाय त्यांच्यासारख्या अनेक लोकांसाठी प्रेरणा आहे, जे संकटांना न जुमानता देशसेवा करण्याचे स्वप्न पाहतात. बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने या चित्रपटात आयपीएस मनोज शर्माची भूमिका चांगलीच साकारली आहे.

भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा संघर्ष 12th Fail या चित्रपटात अतिशय बारकाईने दाखवण्यात आला आहे. मनोज कुमार शर्मा यांनी 2005 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.हेही वाचा

दुकानांवर मराठी पाट्या लावाच! पालिकेची 3000 दुकानांना नोटीस

उल्हासनगरमधील बेकायदा इमारती अधिकृत होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा