Advertisement

मुंबईतील २३० डॉक्टरांना कोरोनाची लागण

ऑमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईतील डॉक्टर्सनाच मोठ्याप्रमाणात आजाराची लागण होताना दिसत आहे.

मुंबईतील २३० डॉक्टरांना कोरोनाची लागण
SHARES

ऑमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईतील डॉक्टर्सनाच मोठ्याप्रमाणात आजाराची लागण होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या २३० डॉक्टर्सना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जेजे रुग्णालयातील ५१, लो. टिळक रुग्णालयामध्ये ३५, केईएममध्ये ४०, नायरमध्ये ३५ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली होती. यावेळी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील रुग्ण वाढ येत्या काही दिवसात आणखी तीव्रतेने वाढणार असून किमान २०-२५ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच ओमायक्रॉनच्या लाटेत डॉक्टर, रुग्णालयातील अन्य कर्मचारी, आणि पोलीसही अधिक प्रमाणात सापडण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा ताण येऊ शकतो.

हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आतापासूनच कठोर उपाययोजना करण्यावर बैठकीत चर्चा झाली होती. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी राज्य सरकार काही महत्त्वाचा निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर हे वसतीगृहामध्ये राहतात. त्यांचे राहते घर मुंबईत नसते. त्यामुळे बाधित असलेल्या निवासी डॉक्टरांना वसतीगृहामधील खोल्यामध्ये विलगीकरणात राहावे लागते.

या निवासाची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक रुग्णालयातील जागा वाढल्या असल्या तरीही निवासाच्या सुविधा अद्ययावत झालेल्या नाहीत. २ पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी राहावे लागू नये, तसेच संसर्गामुळे वैद्यकीय कर्मचारी तसेच डॉक्टरांचे आरोग्य जपायचे असेल तर त्यांच्यासाठीही सुरक्षित अंतराचा नियम वसतिगृहामध्येही पाळायला हवा, असा आग्रह निवासी डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा