Advertisement

कोविड-१९ रुग्णांसाठी राखीव असलेल्या ९०% खाटा रिक्त

ओमिक्रॉनच्या भितीमुळे कोरोनाव्हायरस रूग्णांसाठी राखीव जवळजवळ ९० टक्के बेड रिकामे आहेत.

कोविड-१९ रुग्णांसाठी राखीव असलेल्या ९०% खाटा रिक्त
(Representational Image)
SHARES

मुंबईत सक्रिय COVID-१९ रुग्णांची संख्या वाढत आहे. पण असं असलं तरी ओमिक्रॉनच्या भितीमुळे कोरोनाव्हायरस रूग्णांसाठी राखीव जवळजवळ ९० टक्के बेड रिकामे आहेत.

डॉक्टरांचा हवाला देत एका वृत्तसंत्थेनं माहिती दिली की, अलीकडेच विषाणूची लागण झालेल्यांना सहसा सौम्य किंवा मध्यम लक्षणे कशी दिसतात. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही.

ऑक्टोबरच्या अखेरीस कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट पाहायला मिळत होती. पण डिसेंबरच्या सुरुवातीला कोविड-19 ची लाट मुंबईत पुन्हा दिसली आहे. अनेकांनी दावा केला आहे की, ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे. गेल्या काही दिवसांपासून, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यात मुंबईत अधिक रुग्ण आढळत आहेत.

सोमवार, २७ डिसेंबरपर्यंत, पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत १५,२७८ कोविड-19 खाटांपैकी १३,७८९ जागा रिक्त होत्या. याव्यतिरिक्त, १,९८६ ICU खाटांपैकी फक्त ३०५ भरल्या होत्या. शिवाय, १,१५७ व्हेंटिलेटर बेडपैकी फक्त १८६ जागा व्यापल्या गेल्या होत्या. ऑक्सिजन सपोर्ट असलेल्या ६,७९० बेडपैकी ४९१ भरल्या होत्या.

दुसरीकडे, खासगी रुग्णालयांमध्ये ३,६७१ खाटांपैकी केवळ ७३१ खाटांच वापरात आहेत. अहवालानुसार, मुंबईतील कोरोनाव्हायरस रूग्णांपैकी फक्त ७-१० टक्के रूग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे, शहरात उच्चभ्रू वस्तीतूनच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचंही समोर येत आहे.हेही वाचा

२ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्बंधांबाबत निर्णय घेणार- राजेश टोपे

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आणखी ५ कोरोना केंद्र

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा