Advertisement

मुंबईची हवा मध्यम ते समाधानकारक


मुंबईची हवा मध्यम ते समाधानकारक
SHARES

मे महिन्याच्या सुरुवातीपासून सफर प्रणालीनुसार मुंबईची हवा समाधानकारक ते मध्यम श्रेणीमध्ये असल्याचे नोंदली जात आहे. मेमधील अधिकांश दिवस हवा समाधानकारक असल्याचं निदर्शनास आलं आहे. कमी झालेली वाहतूक आणि कमी झालेली धुळीची वादळे याचा हा संयुक्त परिणाम आहे.

मुंबईमध्ये मंगळवारी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ६४ होता. मंगळवारी कुलाबा येथे हवा मध्यम स्वरूपाची होती. इतर ठिकाणी हवेची गुणवत्ता चांगली आणि समाधानकारक श्रेणीमध्ये होती. मात्र सध्या काही ठिकाणी ओझोनची नोंद होत नसल्याने याचाही परिणाम निर्देशांकावर होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक ठिकाणी कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन डाय ऑक्साइडचीही नोंद होत नाही. मंगळवारी बोरिवली, भांडुप, चेंबूर येथे हवेची गुणवत्ता चांगली होती. मात्र यामध्ये बोरिवली, चेंबूर येथे ओझोनचा निर्देशांक नोंदला गेला नव्हता.

सफर संस्थेच्या माध्यमातून मुंबईमध्ये नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइडचा स्तर निर्धारित सीमेच्या बाहेर जात नाही. त्यामुळे ही नोंद लक्षात घेतली नाही तरी चालेल, असे स्पष्ट केले. मात्र ओझोनचा निर्देशांक उन्हाळ्यात वाढत असल्याने तो लक्षात घेणे गरजेचे आहे. या नोंदी घेऊन त्याची सरासरी नोंदवली जात असल्याने सध्या लॉकडाउनमुळे प्रयत्नांवर निर्बंध येत असल्याची माहिती समोर हेत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा