Advertisement

ठाण्यातील पासपोर्ट कार्यालयाचे मुंबईत विलिनीकरण


ठाण्यातील पासपोर्ट कार्यालयाचे मुंबईत विलिनीकरण
SHARES

मोठ्या प्रशासकीय निर्णयाअंतर्गत ठाण्यातील पासपोर्ट कार्यालयाचे मुंबईतील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात (आरपीओ) विलिनीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील हे पासपोर्ट कार्यालय वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे आहे.

सद्यस्थितीत ठाण्यातील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय वागळे औद्योगिक वसाहतीतील वरदान संकुलात आहे. हे विलिनीकरण २१ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

मुंबईतील पासपोर्ट कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 'इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स'चे कार्यालय, वरळीतील सचिवालयाची शाखा आणि इमिग्रेशन प्रोटेक्टर्स ऑफिस देखील बीकेसीत स्थलांतरीत करण्यात आले आहे.


नव्या कार्यालयाचा टेलिफोन क्रमांक असा आहे -

022- 26520016/26520017/265220071 तसेच ई-मेल आयडी rpo.mumbai@mea.gov.in असा आहे.

या नव्या बदलाबाबत कुणाला माहिती हवी असल्यास कामकाजाच्या दिवशी (बुधवार वगळून) सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान चौकशी करता येईल. लोअर परळ, अंधेरी, मालाड, ठाणे, ठाणे-।। आणि नाशिकमधील पासपोर्ट सेवा केंद्र आहे, त्या ठिकाणीच कार्यरत राहतील.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा