
हा अपघात अंधेरी पश्चिम येथील एका चौकातील सिग्नलवर झाला. सिग्नल बदलण्याची वाट पाहत असताना वाहने थांबलेली होती. त्यावेळी BEST बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने थेट उभ्या असलेल्या रिक्षा आणि कारना धडक दिली. त्यामुळे एकामागोमाग एक वाहनांची साखळी धडक (Chain Collision) झाली.
या अपघातात अनेक रिक्षा आणि कारचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या धडकेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच रस्त्यावरून अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 12 ते 13 रिक्षांसह एकूण सुमारे 14 वाहने बाधित झाली आहेत. हा अपघात बसमधील यांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या निष्काळजीपणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. BEST बसच्या अपघातांबाबत अधिक कठोर सुरक्षा उपाययोजनांची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा
