Advertisement

राणीबागेत होणार पट्टेरी वाघाचं दर्शन

औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाने २ वाघ भायखळ्यातील राणीबागेत (वीर जिजामाता उद्यानात) पाठवण्याचं ठरवल्याने तब्बल २० वर्षांनंतर मुंबईकरांना पट्टेरी वाघाचं दर्शन होणार आहे.

राणीबागेत होणार पट्टेरी वाघाचं दर्शन
SHARES

औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाने २ वाघ भायखळ्यातील राणीबागेत (वीर जिजामाता उद्यानात) पाठवण्याचं ठरवल्याने तब्बल २० वर्षांनंतर मुंबईकरांना पट्टेरी वाघाचं दर्शन होणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.  

राणीबागेचं नूतणीकरण

राणीबागेच्या नूतनीकरणाचं काम सध्या वेगात सुरू आहे. या कामांतर्गत ८ नवीन पिंजरे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे राणीबागेत नवे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने देशातील इतर महापालिका आणि प्रशासनाशी पत्रव्यवहार केले आहेत. असाच एक पत्रव्यवहार औरंगाबाद महापालिकेसोबतही करण्यात आला होता. सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघाची जोडी मिळावी, अशी पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती.

भूमिकेत बदल

सुरूवातीला औरंगाबाद महापालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात सफारी पार्क करायचं असल्याने येथील एकही वाघ अन्य प्राणिसंग्रहालयांना न देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे हा प्रस्ताव अडगळीत पडला होता. परंतु नुकतीच घोडेले यांनी आपली भूमिका बदलत २ वाघ राणीबागेत पाठवण्याचं मान्य केलं आहे. एवढंच नाही, तर यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. तसंच वाघांच्या बदल्यात मुंबईकडून काय मिळणार? याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे २ वाघ मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

२३ वाघांचा जन्म

देशभरात वाघांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त होत असताना सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात मागील २४ वर्षांमध्ये २३ वाघांचा जन्म झाला आहे. या प्राणिसंग्रहालयात सद्यस्थितीत १२ वाघ असून एवढे वाघ असणारं हे राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. त्यातच येथील समृद्धी वाघिणीने एप्रिल महिन्यांत ४ बघड्यांना जन्म दिल्याने वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्राणिसंग्रहालयातील उपलब्ध जागा बघता इथं केवळ आठच वाघ ठेवण्यास मंजुरी आहे. परंतु येथील वाघांची संख्या जास्त झाल्याने २ वाघ मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिंह देखील येणार

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाने लायन सफारीसाठी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाकडे सिंहांची मागणी केली होती. मात्र सक्करबाग प्राणिसंग्रहालयाने नकार देऊन राणीबागेला सिंहांची जोडी देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राणीबागेत वाघाच्या जोडीसाेबत सिंहाची जोडीही दाखल होणार आहे. 

‘हे’ प्राणीही येणार

या पाहुण्यांबरोबरच जग्वार, चित्ता, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, ओकापी, इमू, शहामृग, चिपांझी, लेसर प्लेमिंगो, रिंगटेल लेमूर, तरस, लांडगा, देशी अस्वल, बाराशिंगा, काकर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, काळवीट, लहान मांजर, सांबर, चितळ, काकर हे प्राणीही राणीबागेत आणले जाणार आहेत. त्याचप्रमाणं राणीबागेत पक्षीगृह आणि सर्पालयही तयार करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

राणीबागेच्या विकासासाठी २०० कोटी रुपये

राणीच्या बागेत येणार गुजरातचे सिंह



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा