Advertisement

असुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 16 व्या स्थानावर


असुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 16 व्या स्थानावर
SHARES

भारतात ज्या मुंबई शहराला आपण सर्वात सुरक्षित शहर मानतो. तेच शहर आता जागतिक स्तरावर असुरक्षित शहरांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे.

इकोनॉमिक इंटेलिजेन्स यूनिट (ईआईयू) ने 'सेफ सिटी इंडेक्स 2017' जाहीर केला आहे. या सूचीनुसार मुंबई असुरक्षित शहरांच्या यादीत 16 व्या स्थानावर आहे. 2015 मधील सूचीनुसार 50 शहरांमधून मुंबई 44 व्या स्थानावर होते.


सर्वात सुरक्षित शहर

  • टोकिओ, सिंगापूर, ओसाका


सर्वात असुरक्षित शहर

  • कराची (पाकिस्तान), यांगून (म्यानमार) ढाका (बांग्लादेश)


एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 2015 नंतर मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेत तितकेसे सुधार झालेले नाही. जागतिक स्तरावर विकसनशिल शहरांपैकी एक असलेल्या युरोपमध्ये देखील दहशतवादी हल्ले होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यावर मात करण्यासाठी तिथले प्रशासन संघर्ष करत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि महासंचालक डी. शिवानंदन यांनी 'एचटी'ला दिलेल्या मुलाखतील म्हटले की, मुंबईतील सर्वसामान्य जनतेला स्वसंरक्षणासाठी कोणतेच प्रशिक्षणच दिले जात नाही. म्हणूनच भारतासह मुंबईत असुरक्षिततेचे प्रमाण वाढले आहे. टोकियो, सिंगापूर आणि युरोप यांसारख्या देशांत सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते.



हेही वाचा - 

जागतिक सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 45व्या स्थानावर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा