Advertisement

जागतिक सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 45व्या स्थानावर


जागतिक सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 45व्या स्थानावर
SHARES

भारतात मुंबईला सर्वात सुरक्षित शहर मानले जाते. मुंबई पोलिसांची तुलना नेहमीच स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी केली जाते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई सुरक्षेच्या बाबतीत खूपच मागे आहे.

'द इकोनॉमिस्ट इंटेलिजंस यूनिट’ सेफ सिटी इंडेक्स 2017 च्या अहवालानुसार मुंबई सुरक्षित शहरांच्या यादीत 45 तर दिल्ली 43 व्या स्थानावर आहे. या यादीत जपानमधील टोकियो शहर अव्वल स्थानावर आहे. टोकिया शहराची डिजिटल सुरक्षा मजबूत असल्याने या शहराला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. तर सिंगापूरने दुसरा क्रमांक मिळवला आहे. सुरक्षेच्या बाबतीत पाकिस्तानमधील कराची या शहराची देखील घसरण झाली आहे.

इतकेच नाही तर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रांसमधील एकाही शहराला टॉप दहामध्ये स्थान मिळालेलेच नाही.


टॉप 10 सुरक्षित शहर
टॉप 10 असुरक्षित शहर

टोकियो (89.8%)
कराची (38.77%)
सिंगापूर (89.64%)
यंगून (46.47%)
ओसाका (88.87%)
ढाका (47.37%)
टोरंटो (87.36%)
जकार्ता (53.39%)
मेलबर्न (87.3%)
हो ची मिन्ह सिटी (54.34%)
एमस्टर्डम (87.26%)
मनीला (54.86%)
सिडनी (86.74%)
काराकस (55.22%)
स्टॉकहोम (86.72%)
क्योटो (56.39%)
हाँगकाँग (86.22%)
तेहरान (56.49%)
ज्युरिख (85.2%)
काहिरा (58.33%)




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा