Advertisement

भाज्या कडाडल्या; मुंबईकर म्हणतात खायचं काय?


भाज्या कडाडल्या; मुंबईकर म्हणतात खायचं काय?
SHARES

भाजपाच्या काळात जीएसटीमुळे अनेक गोष्टी महागल्या. जीवनोपयोगी वस्तू खाद्यपदार्थ, डाळी यांच्या किंमती गगनाला भीडल्यामुळे खरेदी विक्रीवर परीणाम झाल्यामुळे लोकांची अर्थिक स्थिती डळमळली आहे. त्यातच यंदा अवकाळी पावसामुळे शेतकरी पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे सध्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.


दिवाळी पूर्वी आठवड्याभरापासून भाज्यांचे भाव 20-40 रुपयांनी वाढल्यामुळे गृहीणींचे बजेट अगदी कोलमडून गेले आहे. यंदाच्या दिवाळीत जीएसटीमुळे सर्वसामान्यांच्या दिवाळीवर महागाईचे सावट असल्यामुळे बाजारपेठेत आर्थिक मंदी पहायला मिळाली होती. भरलेल्या मालापैकी 50 टक्के देखील माल खपला नसल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यापारी देत होते. त्यातच आता अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे येणाऱ्या मालाच्या 50 टक्के देखील सध्या आवक होत नसल्याचे चित्र दादरच्या बाजारपेठेत आहे. जोपर्यंत बाजारात भाज्यांची आवक वाढत नाही तोपर्यंत हे दर असेच रहाणार असल्याचे मत भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.


महागाई कितीही झाली तर लागणाऱ्या गोष्टी खरेदी कराव्या लागतात. मोदी सरकारच्या काळात कपडे आणि गृहोपयोगी वस्तू देखील प्रचंड प्रमाणात महाग झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्व गोष्टींवर कर लावल्यानंतर भाज्यांचे दर कमी होतील असं वाटलं होतं. पण भाज्या 150 ते 180 प्रति किलो दराने विकल्या जात आहेत. भाज्या खावं की नको अशी द्विधा मनस्थिती झाली आहे. पूर्वी 100 रुपयात घर चालवता येत होते. पण हल्ली हे बजेट 250 रुपयांच्या पुढे गेलं आहे.
- प्रज्ञा जोशी, ग्राहक, दादर


दिवाळीच्या आठवड्याभरापूर्वी सर्व वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. अचानक वाढत असलेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. पूर्वी जेवढी आवक दररोज व्हायची त्याच्या 50 टक्के देखील भाज्या सध्या मार्केटमध्ये येत नाहीत. ऐरवी 5-10 रुपयांत मिळणारी पालकची जुडी सध्या भायखळा मार्केटमध्ये 100 रुपये दराने विकली जात आहे. मालाची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांनी भाजी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. लोकांनी भाज्या खरेदीचे प्रमाण कमी केले आहे.
- संतोष पाल, भाजी विक्रेते, दादर


नोहमी दिवाळीत होणाऱ्या खरेदीपेक्षा यंदा अर्धीच खरेदी झाली आहे. यंदा 50 टक्के ग्राहकांनीच खरेदी केली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक आणि भाज्या खराब झाल्या. त्यामुळे बाजारपेठेत भाजीची कमतरता आहे. जोपर्यंत आवक वाढत नाही तोपर्यंत ही महागाई अशीच राहील. लोकांचा खरेदीला थंड प्रतिसाद मिळत आहे. भाज्यांचे दर कमी कधी होतील हे आता सांगणे कठीण आहे.
- प्रकाश राणे- भाजी विक्रेते, दादर


दादर मार्केटमध्ये भाज्यांचे सोमवारचे दर


भाज्या
दर (प्रति किलो)
टोमॅटो
40 रु.
आलं
80 रु.
मिरची
80 रु.
कांदा
50 रु.
बटाटा
20 रु.
मेथी जुडी
80 रु.
कांदापात जुडी
50 रु.
पालक जुडी
80-100 रु.
चवळी जुडी
50 रु.
कोथिंबीर
100-110 रु.
फरसबी

80 रु.
सिमला मिर्ची
80 रु.
दुधी
60 रु.
फ्लॉवर
80 रु.
कोबी
60 रु.
काकडी
80 रु.
बीट
80 रु.
वांगी
80 रु.
तोंडली
60 रु.
सुरण
50 रु.
गाजर
80 रु.
भेंडी

80 रु.
घेवडा
80 रु.
कारली
80 रु.
दोडका
80 रु.
वाटाणा
160 रु.
गवार
100 रु.
रताळे
40 रु.
पावटे
120 रु.
तूर शेंग (ओली)
80 रु.
चवळी शेंग (ओली)
80 रु.
ओला भुईमूग
60 रु.
पडवळ
60 रु.
घोसाळे
40 रु.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा