Advertisement

कोस्टल रोडवर आता 236 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली याचीही नोंद ठेवता येत आहे.

कोस्टल रोडवर आता 236 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
SHARES

मुंबई सागरी किनारा मार्ग (coastal road project) वाहन चालकांसाठी टप्प्याटप्यात वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला आहे. या मार्गावर वाहनांवर नजर ठेवण्यासाठी 236 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत.

एखादा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षाला या कॅमेऱ्यांमार्फत माहिती मिळणार आहे. तर अपघातग्रस्तांनाही वेळेवर मदत पोहोचवात येणार आहे. दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली याचीही नोंद ठेवता येत आहे.

शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत सागरी मार्ग प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर आहे.

वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रकल्पावर ठिकठिकाणी विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत. या मार्गावर चार प्रकारचे वैशिष्टय असलेले 236 कॅमेरे बसवून ते कार्यान्वित केले आहेत.

हे कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्यांमार्फत कारवाई वाहतूक पोलिसांना करणे शक्य होईल.

सागरी किनारा मार्गावर जुळे बोगदे बांधण्यात आले आहेत. या दोन्ही बोगद्यांमधील आंतरमार्गिकाजवळ प्रत्येकी 50 मीटर अंतरावर अपघात ओळखणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

दोन्ही बोगद्यांमध्ये कार अपघात, चुकीच्या दिशेने जाणारी वाहने इत्यादी घटनांची हे कॅमेरे आपोआप ओळख करतात. तसेच अशी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षाला तात्काळ सूचना देतात.

सामान्यपणे वाहतूक सुरक्षेसाठी 71 निगराणी कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे फिरवता, झुकवता व झूम करता येतात. जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा या कॅमेऱ्यांमधील व्हिडीओ इन्सिडेन्ट डिटेक्शन यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने घटना ओळखते आणि आपोआप त्या घटनेकडे लक्ष केंद्रीत करते. दोन्ही भूमिगत बोगद्यांमध्ये असे 71 कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

मुंबई (mumbai) किनारी रस्ता प्रकल्पातील भूमिगत बोगद्याचे प्रवेशद्वार व निर्गमाद्वारे एकूण चार कॅमेरे बसवण्यात आले आहेत. भूमिगत बोगद्यांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजणे, त्यांचे वर्गीकरण करणे यासाठी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सागरी किनारा मार्ग (mumbai coastal road) नव्यानेच उभारण्यात आल्याने या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी वाहने ओळखण्यासाठी सात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची छायाचित्रे व त्यांच्या वाहन क्रमांकाची नोंद हे कॅमेरे करतील.



हेही वाचा

डोंबिवलीच्या तरूणाचा आफ्रिकेत कौतुकास्पद विक्रम

रक्तपेढ्यांसाठी आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा