Advertisement

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मुंबईचा डबेवाला होणार 'पार्सल बॉय'

कंपन्याही बंद असून 'वर्क फ्रॉम होम'च्या नियमानुसार काम करत आहेत. त्यामुळं केवळ जेवणाचे डबे पोहोचवून आपलं पोट भरणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मुंबईचा डबेवाला होणार 'पार्सल बॉय'
SHARES

कोरोना (coronavirus) काळात कार्यालयं बंद असल्यानं अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं आहे. शिवाय कंपन्याही बंद असून 'वर्क फ्रॉम होम'च्या नियमानुसार काम करत आहेत. त्यामुळं केवळ जेवणाचे डबे पोहोचवून आपलं पोट भरणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळं या डबेवाल्यांसाठी शहरातील खासगी हॉटेलचालकांनी पुढाकार घेतला असून, मुंबईचा डबेवाला आता 'पार्सल बॉय' होणार आहे.

कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मिळेल ते काम करून डबेवाले पैसे कमाविण्याचा प्रयत्न करत आहेत. लॅाकडाउनच्या काळात हॉटेल व्यवसाय बंद आहे. पण हॉटेल्सना पार्सलच्या ॲार्डर घेण्यास परवानगी आहे. सध्या पार्सल ॲार्डर घरोघरी पोहोचवायला मनुष्यबळाची गरज आहे. अशा वेळी काही ठिकाणी ही गरज डबेवाल्यांनी पूर्ण केली आहे. काही हॉटेलमालकांनी ठराविक डबेवाल्यांना डिलिव्हरी करण्याचं काम देण्यास सुरुवात केली आहे.

'फूड मॅटर्स इंडिया लिमिटेड' या कंपनीकडून कुलाब्यातील ३ आणि भायखळ्यातील २ अशा एकूण ५ टप्प्यात डबेवाल्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या पार्सल सेवेसाठी मुभा देण्यात आली आहे. हे पार्सल घरी पोहोचवण्यासाठी डबेवाल्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

रिक्षाचालकांच्या धर्तीवर डबेवाल्यांना सरकारनं प्रत्येकी १५०० रुपयांची मदत करावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. सरकारकडून अद्याप डबेवाल्यांसाठी मदतीची घोषणा झालेली नाही, असं ही डबेवाला संघटनेनं स्पष्ट केलं.



हेही वाचा -

मुंबईतील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा